महत्वाच्या घडामोडी

गरबा पाहायला गेली अन घडलं असं काही.. ऐकून तुम्हालाही धक्का बसेल…

प्रतिनिधी / इंदूर

इंदूरच्या गौरी नगरात काल रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे.. आईच्या कुशीत बसून गरबा पाहणाऱ्या एका मुलीचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे.. माही शिंदे असे या मुलीचे नाव आहे.. काल रात्री नवरात्रीचा शेवटचा दिवस असल्यामुळे माही हिने आईकडे गरबा पाहण्यासाठी जाण्याचा हट्ट धरला.. त्यामुळे आई तिला गरबा पाहण्यासाठी घेऊन गेली..

गरबा पाहण्यासाठी माही तिची आई आणि लहान भाऊ हे तिघेजण गेले.. माही तिची आई रक्षा शिंदे यांच्या मांडीवर बसली होती आणि माहीचा लहान भाऊ आईच्या शेजारी बसला होता.. तिघेजण गरबा पाहत होते.. त्यावेळी अचानक माहीच्या डोक्याला जखम झाली आणि रक्तस्त्राव सुरु झाला.. त्यामुळे माही बेशुद्ध पडली.. माही अचानक बेशुद्ध पडल्याने तिच्या आईने आसपासच्या लोकांकडे मदत मागितली आणि माहिला लगेच रुगणालयात दाखल करण्यात आले.. माहीच्या डोक्यातून बराच वेळ रक्तस्त्राव सुरु होता..

माहीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.. माहीला गरबा पाहत असताना अचानक बंदुकीची गोळी लागली, आणि तिच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरु झाला.. गरबा पाहताना माहीच्या आईने गोळीबाराचा आवाज ऐकला होता.. शेजारच्या इमारतीतून गोळीबार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.. माहीचे वडील संतोष शिंदे हे शारदा नगरात किराणा मालाचे दुकान चालवतात.. बंदुकीतून झाडण्यात आलेली गोळी माहीच्या डोक्याला लागली.. हा गोळीबार कशासाठी करण्यात आला, ही गोळी कोणी झाडली याचा शोध पोलीस घेत आहेत.. या घटनेने माहीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *