महत्वाच्या घडामोडी

दुसऱ्या लग्नानंतर गर्भवती महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह संपवले जीवन.. पाहा नक्की काय घडलं…

प्रतिनिधी / सांगली

जत तालुक्यातील सिंदूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.. येथे राहणाऱ्या एका गर्भवती आईने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे.. लक्ष्मी धानेशा माडग्याळ ( वय – २३ ) असे गर्भवती असलेल्या महिलेचे नाव आहे.. तर दिव्या धानेशा माडग्याळ ( वय – ०२ ) वर्ष, श्रीशैल्य धानेशा माडग्याळ ( वय – ०१ ) अशी मृत झालेल्या दोन मुलांची नावे आहेत..

पाच वर्षापूर्वी नात्यातील तरुणासोबत लक्ष्मी हिचा विवाह झाला होता.. परंतु लक्ष्मी हिने धानेशा यांच्यासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला होता.. हा विवाह लक्ष्मी हिच्या माहेरच्या नातेवाईकांना मान्य नव्हता, त्यामुळे त्यांनी लक्ष्मी तिच्यासोबत असलेले सगळे संबंध तोडून टाकले होते..

लक्ष्मी हिला दोन वर्षाची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा असी दोन मुले आहेत आणि सध्या ती तीन महिन्याची गरोदर होती.. लक्ष्मी आणि धानेशा यांचे प्रेमप्रकरण संपवण्यासाठी लक्ष्मीच्या आई – वडिलांनी धानेशा याला पैसे दिले होते.. त्यामुळे लष्मी आणि धानेशा यांच्यात या पैशावरून सतत भांडण होत असत..

तीन महिन्यांची गर्भवती लक्ष्मी आपल्या दोन मुलांसह काल सायंकाळपासून बेपत्ता असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिचा शोध घेण्यात आला असता शेतातल्या विहिरीमध्ये लक्ष्मी आणि तिच्या दोन मुलांचा मृतदेह तरंगताना आढळून आला.. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.. आणि विहिरीतील मृतदेह बाहेर काढले..

सतत होणाऱ्या भांडणामुळे लक्ष्मी हिने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.. या धक्कादायक घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *