सामाजिक

गणपती डेकोरेशनसाठी डुप्लिकेट फुलं वापरताय ? तर ही बातमी वाचा…

प्रतिनिधी / पंढरपूर

सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे.. अनेक गणपती मंडळांनी नयनरम्य देखावे सादर केले आहेत.. काही गणेशोत्सव मंडळे गणपतीच्या डेकोरेशनसाठी अनेक महागड्या वस्तू वापरत असतात.. यात अनेक कृत्रिम फुलांचाही समावेश असतो..

मात्र कृत्रिम फुलांच्या वापरामुळे शेतकऱ्यांनी शेतात उत्पादित केलेल्या फुलांना बाजारात मागणी मिळत नाही.. व त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.. आणि कृत्रिम फुलांमुळे पर्यावरणाचे प्रदूषणही होत असल्याने आमदार दत्तात्रय सावंत पतसंस्थेचे चेअरमन अपूर्व सावंत यांनी एक विधायक उपक्रम हाती घेतला आहे.. ” कृत्रिम फुलांमुळे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास हा चिंतेचा विषय असून त्याबाबत गणेशोत्सव मंडळांनी जनजागृती करून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फुलांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले..

त्यांनी गणपती मंडळांना भेटी देऊन फुलांची रोपे भेट दिली आहेत.. या उपक्रमावेळी गावातील तरुण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *