महत्वाच्या घडामोडी

केसांमध्ये कोरले गणपती बाप्पा…

प्रतिनिधी / पंढरपूर

आज आपल्या लाडक्या गणरायाचे सर्वत्र आगमन होत आहे.. गणेशाच्या स्वागतासाठी प्रत्येकजण आतुरलेला असतो.. वाजतगाजत गणपतीचं आगमन असो, किंवा नयनरम्य डेकोरेशन असो.. गणपतीच्या स्वागतामध्ये भक्तजन कोणतीच कसर ठेवत नाहीत..

मात्र काही भक्तजन हे नेहमी काहीतरी हटके करताना दिसतात.. आता हेच पहा ना.. हे आहेत सुरज कदम, पृथ्वीराज आवताडे, आणि ओम सपताळ, या तिघांनी आपल्या डोक्यावर गणेशाची मूर्ती रेखाटून घेतली आहे..

रांझणी ता. पंढरपूर येथील ओंकार हेअर स्टाईल मध्ये आदित्य सपताळ यांनी हे गणपती रेखाटले असून सर्वत्र हा कौतुकाचा विषय झाला आहे.. आजपर्यंत कटिंगचे आपण वेगवेगळे प्रकार पाहिले असतील.. कटिंगमध्ये चक्क गणपती रेखाटल्याने हा कौतुकाचा आणि लोकांच्या औस्तुक्याचा विषय झाला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *