Uncategorizedसामाजिक

राज्याला मिळाला पाहिला तृतीयपंथीय नगरसेवक

राज्यातील पहिला तृतीयपंथीय सरपंच म्हणून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधील तरंगफळ गावातील ज्ञानदेव कांबळे यांची निवड झाली होती.. आताही तशीच एक विधायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातून समोर आली आहे..

हुपरी नगरपरिषदेमध्ये एका तृतीयपंथीयाला स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली आहे.. हुपरी भागात ‘ देवआई ’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तातोबा बाबुराव हांडे यांना तेथील स्थानिक ताराराणी आघाडीने स्वीकृत नगरसेवक पदी बसण्याचा मान दिला आहे..

त्यामुळे नगरपालिका आवारात गुलाल आणि भंडारा उधळत या घटनेचा जल्लोष करण्यात आला.. २०१७ साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीत तातोबा हांडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता , मात्र त्यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज अवैध ठरवला होता.. मात्र हांडे यांची काम करण्याची तळमळ पाहून त्यांना ही संधी दिली असल्याचं बोललं जातंय..

इथून पुढच्या काळात आपण तृतीयपंथीयांच्या अनेक प्रश्नाबाबत सकारात्मक काम करणार असल्याच मत तातोबा हांडे यांनी व्यत केलं आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *