महत्वाच्या घडामोडी

धक्कादायक ! वडिलांनीच संपवले आपल्या मुलीचे जीवन…

प्रतिनिधी / छत्तीसगड

छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यातील मेनपत येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.. आपल्या पोटच्या अवघ्या तीन वर्षाच्या मुलीसोबत एक बाप सैतानासारखा वागला आहे.. प्रमोद मांझी असे या आरोपी बापाचे नाव आहे..

प्रमोद मांझी रात्री झोपले असताना त्यांची तीन वर्षाची मुलगी अचानक रडायला लागली.. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून प्रमोद यांना राग आला.. या रागाच्या भरात प्रमोद यांनी आपल्या मुलीच्या नाकावर जोरात बुक्की मारली.. ही मारलेली बुक्की जीवघेणी ठरली आणि या चिमुकल्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे..

मुलीचा जागीच मृत्यू झाल्याने पती-पत्नी दोघेही घाबरले.. आता आपल्याला तुरुंगात जावे लागणार या भीतीने प्रमोद यांनी आपल्या मुलीचा मृतदेह घेऊन घुनघुट्टा या नदीमध्ये फेकून दिला.. त्यानंतर प्रमोद यांनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार केली..

पोलिसांनी गांभीर्याने या घटनेचा तपास सुरु केला.. प्रमोद मांझी यांच्या शेजारच्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना प्रमोद आणि त्यांची पत्नी यांच्यावर संशय आला.. पोलिसांनी प्रमोद आणि त्यांच्या पत्नीची कसून चौकशी केल्यानंतर या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.. बापाच्या क्षणभर रागाने एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे.. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *