महत्वाच्या घडामोडी

लेकीच्या अंगात भूत शिरल्याचा संशय, जन्मदात्या बापानेच घेतला मुलीचा जीव…

प्रतिनिधी / केरळ

केरळमधील सोमनाथ जिल्ह्यातील धावा गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.. या गावात एका पित्यानेच आपल्या पोटच्या मुलीचा जीव घेतला आहे.. भावेश अकबरी असे या पित्याचे नाव आहे.. तर धैर्या अकबरी ( वय – १४ ) वर्षे असे या मृत झालेल्या चिमुकलीचे नाव आहे..

आपल्या मुलीच्या अंगात भूत असल्याचा संशय पिता भावेश यांना होता.. या संशयामुळे त्यांनी धैर्याचा सलग सात दिवस छळ केला.. तिला काठ्यांनी आणि तारांनी मारहाण केली.. तिला उपाशी ठेवले.. या प्रकारामुळे सातव्या दिवशी धैर्याने आपला जीव सोडला..

या घटनेची संपूर्ण माहिती कोणीतरी पोलिसांना दिली.. भावेश या पित्याने अगोदर काळी जादू करून धैर्याला जमिनीत गाडले आणि नंतर तिला बाहेर काढून जाळलं.. असं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं आहे..

मुलीच्या अंगात भूत असल्याचा संशय भावेशला होता, त्यामुळे त्याने सतत सात दिवस मुलीचा छळ केल्यानंतर तिची हत्या केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.. धैर्याचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी भावेशचा भाऊ दिलीप यानेही त्याला मदत केली होती.. या घटनेने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.. परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *