स्पेशल स्टोरीज

शेतकऱ्याची लेक जिद्दीने झाली अधिकारी…

प्रतिनिधी /पंढरपूर :-

गावखेड्यातल्या अनेक मुली सध्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवत आहेत.. घरची परिस्थती नाजूक, आई वडील रोजंदारीच्या कामावर जात असूनही मोठ्या जिद्दीच्या व कष्टाच्या बळावर जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता म्हणून निवड झालेल्या एका मुलीची प्रेरणादायी गोष्ट आपण पाहणार आहोत..

सारिका मोहन खुने

फुलचिंचोली तालुका पंढरपूर येथील ही आहे सारिका मोहन खुने.. घरची परिस्थिती हलाखीची, त्यामुळे कोणताही क्लास व अभ्यासिका न लावता तिनं मिळवलेलं यश कौतुकास्पद आहे..

सारीकाचं प्राथमिक शिक्षण गावाकडच्या प्राथमिक शाळेत झालं.. माध्यमिक शिक्षण नवोदय मध्ये तर महाविद्यालयिन शिक्षण तिने केबीपी पंढरपूर व सिंहगड कॉलेज कोर्टी येथून पूर्ण केलं.. सिंहगड मध्ये सिव्हिल इंजनियरिंग पूर्ण केल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.. मात्र पाहिल्या प्रयत्नात तीला अपयश आलं.. तरीही ती खचली नाही..  आणि पुन्हा मोठ्या जिद्दीनं तिनं अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं..

सारिकाचे आईवडील अशिक्षित.. आपल्याला शिकता आलं नाही, निदान आपली लेकरं तरी शिकली पाहिजे हा त्यांचा अट्टाहास होता.. त्यासाठी त्यांनी मुलांना शिकवलं.. प्रसंगी पोटाला चिमटा घेतला, मात्र सारीकाला त्यांनी कशाची कमी जाणवू दिली नाही.. आपण एवढ्या कष्टातून मुलीला शिकवलं, मात्र तिनंही कापल्या कष्टाचं पांग फेडल्याचं पाहून सारीकाच्या आईवडिलांना हुंदका दाटून येतो…

सारिका आता अधिकारी झाली.. मात्र त्याचं सगळं श्रेय ती आपले आईवडील,चुलता-चुलती, शिक्षक, मामा, भाऊ आणि बहिणींना देते.. आपलं कुटुंब एखाद्या मुलीमागे खंबीर उभं राहिलं तर कठीण परिस्थितीलाही भेदून यश मिळवता येतं, हे सारिकानं दाखवून दिलंय.. तिचं यश अनेक मुलींसाठी प्रेरणादायी आहे.. तिच्याकडून अनेकांनी प्रेरणा घ्यावी हीच अपेक्षा..

एबी मराठी न्यूज, फुलचिंचोली

पूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी क्लीक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *