शेतकरी

शेतकऱ्याने शेण विकून बांधला तब्बल एक कोटी रुपयांचा बंगला

सांगोला / एबी मराठी न्यूज नेटवर्क

सरकारी अधिकारी, राजकारणी, अभिनेते किंवा मोठे उद्योगपती यांनी बांधले कोट्यावधींचे बंगले” अशा आशयाच्या बातम्या तुम्ही याआधी वाचल्या किंवा पाहिल्या असतील.. मात्र आज आम्ही तुम्हाला एका शेतकऱ्याच्या जिद्दीची आगळीवेगळी गोष्ट सांगणार आहोत..

सांगोला तालुक्यातील सावे इमडेवाडी या गावातल्या शेतकऱ्याने फक्त गायीच्या शेणावर तब्बल एक कोटी रुपयांचा टोलेजंग बंगला बांधला आहे.. प्रकाश इमडे असं या शेतकऱ्याच नाव.. या शेतकऱ्याची गोष्ट फार प्रेरणादायी आहे..

सुरवातीला सन १९९८ साली त्यांनी एक गाय खरेदी केली.. एका गायीपासून दोन.. दोनापासून चार.. चार पासून आठ असं करत त्यांनी तब्बल १२५ गायी पाळल्या आहेत.. आणि दुग्धव्यवसायातही भरभराट केली आहे..

परफेक्ट नियोजन, चांगल्या प्रतीचा चारा, योग्य खबरदारी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आणि कष्ट करण्याची तयारी या बळावर हे शक्य झालं असल्याचं ते सांगतात..

गायींचा व्यवसाय करत असताना शून्यातून सुरवात करावी लागते.. हळूहळू अंदाज येईल तेव्हा गायींची संख्या वाढवायला हवी.. एकाचवेळी अनुभव नसताना जास्त गायी पाळल्या तर नियोजनात गफलत होऊ शकते, व त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक व मानसिक तोटा सहन करावा लागतो, व समाजात गायी परवडत नाहीत असा चुकीचा संदेश जातो, असं त्यांच मत आहे..

प्रकाश इमडे यांनी सुरवातीला जी गाय खरेदी केली होती, त्या गायीचा फोटो ते आजही आपल्या देव्हाऱ्यात पूजतात.. त्या गायीमुळे आपलं कल्याण झाल असल्याची त्यांची भावना आहे..

प्रकाश इमडे यांचा मुलगा विजय इमडे हा देखील आता हा व्यवसाय सांभाळतो आहे.. त्यांच्याकडे एकूण तीन मजूर आहेत.. तीन मजूर या गायींचा सांभाळ करतात..

तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता व्यवसायात आलं तर चांगलं यश मिळू शकतं, फक्त आपले प्रयत्न प्रामाणिक असायला हवे, असं त्यांच मत आहे..

ज्या गायींनी आपल्याला चांगले दिवस दाखवले, त्या गायींच्या बद्दल प्रकाश इमडे यांच्या मनात प्रचंड आदर आहे.. त्यामुळेच त्यांनी आपल्या एक कोटी रुपयांच्या बंगल्यावर गायीचा पुतळा उभारला आहे..

प्रकाश इमडे यांनी उभारलेलं हे विश्व पाहायला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी येत असतात.. इमडे बंधू देखील प्रत्येकाला मार्गदर्शन करत असतात..

( खालील व्हिडीओ नक्की पहा )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *