शेतकरी

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने पोळ्याच्या दिवशीच संपवले जीवन…

प्रतिनिधी / बोदवड

हिंगणा येथील एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कैलास नामदेव पाटील असे या मृत्यू झलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. हिंगणा परिसरात कैलास यांचे शेत असून, सततच्या नापिकीमुळे त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत होता. तसेच, कार्यकारी सोसायटीचे देखील कर्ज त्यांच्यावर होते.

या कर्जाला कंटाळूनच त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर त्यांना मुक्ताईनगर येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आणि तेथून जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. पोळ्याच्या आदल्यादिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *