महत्वाच्या घडामोडी

शेतात जाताना शेतकऱ्यावर काळाचा घाला…

प्रतिनिधी / जळगाव

यावल तालुक्यात चिखली येथे शेतरस्त्यावरून गेलेला विजेचा तार एका बैलगाडीवर कोसळून शेतकऱ्यासह एका बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. यशवंत कामा महाजन (वय -६५ ) रा. चिखली बुद्रुक असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.. यशवंत हे नेहमीप्रमाणे बैलगाडी घेऊन शेतात जात होते..

गावापासून काही अंतरावर गेल्यानंतर रस्त्यावरून गेलेला विजेचा तार अचानकपणे बैलगाडीवर कोसळला.. आणि विजेचा जोरदार धक्का बसून यशवंत महाजन यांचा मृत्यू झाला, तर बैलगाडीचा एक बैल ही जागीच ठार झाला.. घटनेची माहिती मिळताच पोलीस भागवत पाटील हे घटनास्थळी पोहोचले..

काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे महावितरण कंपनीचे सैल असलेले विजेचे तार तुटले असावेत आणि त्यातून ही मोठी घटना घडली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.. महावितरण कंपनीच्या कारभारावर ग्रामस्थांकडून रोष व्यक्त केला जात आहे..

महावितरण कंपनीने वेळीच लक्ष देऊन जर हे विजेचे तार ओढून घेऊन व्यवस्थित केले असते तर, कदाचित आज ही दुर्दैवी घटना घडली नसती, असे ग्रामस्थांकडून बोलले जात असून, मयत यशवंत यांना शासकीय मदत मिळावी अशीही मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *