महत्वाच्या घडामोडी

हॉस्पिटल मध्ये शिरला चक्क हत्तींचा कळप…

प्रतिनिधी / पश्चिम बंगाल

सोशल मिडीयावर आपण अनेक व्हिडीओ व्हायरल होताना पाहतो.. काही व्हिडीओज मन सुन्न करणारे असतात तर काही थक्क करणारे असतात.. असाच एक थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.. पश्चिम बंगालच्या जाल्पैगुरी जिल्ह्यातील एका हॉस्पिटलमध्ये चक्क हत्तींचा कळप फिरत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे..

या व्हिडीओमुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.. मुळात हॉस्पिटलमध्ये हत्तींचा कळप आलाच कसा, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे.. व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकता की हॉस्पिटलच्या प्रिमायसेस मध्ये हत्ती बिनधास्तपणे फिरत आहे..

सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असून, त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.. अशाप्रकारे प्राण्यांचा हॉस्पिटलमध्ये खुलेआम वावर हे रुग्णांच्या सुरक्षेसाठी एक प्रकारचा मोठा धोका आहे, असे म्हणणे नागरिकांकडून होत असून, तीव्र संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे.. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून शासनाने या घटनेविरुद्ध त्वरित पाऊले उचलावीत अशी मागणी सुद्धा नागरिकांकडून होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *