शेतकरी

बोगस तननाशक फवारल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान…

प्रतिनिधी / करकंब

पंढरपूर तालुक्यातील करकंब व गार्डी येथील २० ते २५ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे गायस्टॉप हे बोगस तननाशक औषध फवारल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेला आहे.. शेतकऱ्याच्या द्राक्ष बागा फुटलेल्या नाहीत त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे दोन ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.. या भागातील शेतकरी हवालदिल झालेला आहे.. अगोदरच कर्जबाजारी झालेला आहे..

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे एकीकडे कंबरडे मोडलेले असताना पंढरपूर तालुक्यातील काही दुकानदार व डीलर महाराष्ट्रमध्ये बंदी असलेली काही औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत.. त्यामुळे चुकीचे औषध द्राक्षा सारख्या संवेदनशील पिकाला हानिकारक ठरत आहे..

या नुकसानीमुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असून आत्महत्येशिवाय पर्यायच राहिला नाही असे बोलत आहेत.. आज या ठिकाणी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत सर व भाजप किसान मोर्चा चे माऊली हळणवर यांनी भेट दिली.. शेतकऱ्यांचे सांत्वन केले व मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे..

यावेळी बोलताना माऊली हळणवर म्हणाले की, शेतकऱ्यांनी हादरून न जाता आलेल्या संकटाला सामोरे जावं.. आम्ही तुमच्या सोबत आहोत.. राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे.. कंपनीकडून, दुकानदाराकडून व सरकारकडूनही मदत मिळवू व सदर कंपनी डीलर दुकानदार यांच्यावरती गुन्हा दाखल करूया असे आश्वासन दिले.. यांच्यासोबत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजीराजे बाबर व या भागातील नुकसान ग्रस्त शेतकरी उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *