महत्वाच्या घडामोडी

दोस्त बनून आला आणि नवरदेवालाचं लुटलं! पाहा हा धक्कादायक व्हिडीओ…

प्रतिनिधी / व्हायरल

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग असतो.. त्यामुळे आपल्या लग्नात आपली सगळी हौस भागवता आली पाहिजे आणि आपल्या मनाप्रमाणे आपले लग्न झाले पाहिजे याकडे अनेकांचा ओढा असतो.. आपल्या लग्नात आपले मित्र आणि नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते.. त्यामुळे आपण लग्नासाठी आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना आग्रहाच निमंत्रण देत असतो..

आपल्या मित्राला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या विवाह सोहळ्यात मित्रदेखील आवर्जून सामील होतात आणि धमाल करतात.. मात्र सोशल मिडीयावर सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.. या व्हिडीओमध्ये लग्न सुरु असताना या कार्यक्रमात नवरदेव व्यस्त असताना दिसत आहे.. आणि नवरदेवाच्या शेजारी बसलेला त्याचा मित्र चक्क नवरदेवाचेच पैसे चोरताना दिसत आहे.. नवरदेवाला गळ्यात नोटांची माळ घातली आहे आणि ती माळ त्याने काढून बाजूला ठेवली आहे.. मात्र नवरदेवाच्या शेजारी बसलेला त्याचा मित्र या माळेतील नोटांवर डल्ला मारताना दिसत आहे..

सुरवातीला हा मित्र शांतपणे नवरदेवापाशी बसलेला दिसतो आहे.. नंतर त्याने नोटेच्या माळेतील एक एक नोट काढून आपल्या खिशात घालताना दिसत आहे.. आपल्याकडे कोणी पाहात तर नाही ना, याची खातरजमाही तो करतो आहे.. नंतर तो दुसऱ्यांदा माळेतील नोट काढून आपल्या खिशात घालतो.. मात्र यावेळी नवरदेव संशयाने त्याच्याकडे पाहतो आणि काय घडतंय याची खातरजमा करतो.. नवरदेवाला संशय आल्याचं समजताच हा मित्र आपली चोरी थांबवतो आणि लग्नाच्या पुढील विधीत सहभागी होतो.. हा व्हिडीओ पाहून ‘नवरदेवाला लुटणारा मित्र’ आजपर्यंत पाहिला नव्हता असे काहीजणांनी आपले मत व्यक्त केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *