महत्वाच्या घडामोडी

धक्कादायक ! विद्यार्थ्याला दोनचा पाढा आला नाही म्हणून शिक्षकाने केलं असं काही…

प्रतिनिधी / उत्तर प्रदेश

उत्तर प्रेदेशातील एका शाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. येथे एका प्राथमिक विद्यालयाच्या ५ वीच्या विद्यार्थ्याला दोनचा पाढा आला नाही म्हणून शिक्षकाने त्या विद्यार्थ्याच्या हातावर ड्रील मशीन चालवले आहे..

बिवान असे या मुलाचे नाव आहे.. या मुलाला शिक्षकाने दोनचा पाढा म्हणावयास सांगितले होते.. मात्र त्याला दोनचा पाढा आला नाही.. यामुळे त्या शिक्षकाला राग आला आणि रागाच्या भरात शिक्षकाने त्याच्या हातावर ड्रील मशीन डागली..

या प्रकारामुळे या विद्यार्थ्याच्या हातातून रक्त येऊ लागले होते.. या घटनेची माहिती बीएएसला मिळाल्यानंतर या अधिकाऱ्यांनी शाळेत येऊन त्याची पाहणी केली.. आणि त्यानंतर या शिक्षकाला तातडीने निलंबित करण्यात आले आहे..

शाळेत हे ड्रील मशीन विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाच्या अभ्यासक्रमासाठी ठेवण्यात आले होते.. परंतु हे शिक्षक विद्यार्थ्याना घाबरवण्यासाठी या मशीनचा वापर करत होते.. हा शिक्षक एका संस्थेद्वारे या शाळेत काम करत होता.. अशा संस्थाना काढून टाकले पाहिजे अशी मागणी पालकांनी केली आहे.. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *