महत्वाच्या घडामोडी

तरुणांना बसचा धक्का लागला आणि पोलीस भरतीचं स्वप्न अधुरचं राहील, पाहा नक्की काय घडलं ?

प्रतिनिधी / बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर – पिंपळगाव येथे देवी मार्गावर पोलीस भरतीचं स्वप्न बाळगून सकाळी रस्त्याच्या कडेला दोन तरुण व्यायाम करत असताना एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे.. पोलीस भरतीसाठी हे दोन तरुण व्यायाम करत असताना याच मार्गावरून मलकापूर आगाराची बस जात होती.. मात्र या बसच्या तुटलेल्या पत्र्याचा धक्का लागून या दोन तरुणांचे हात अक्षरशः तुटून खाली पडले आहेत..

विकास गजानन पांडे आणि परमेश्वर पाटील अशी या दोन तरुणांची नावे आहेत.. या बसच्या चालकाच्या मागील बाजूचा पत्रा तुटून बाहेर आला होता.. त्यामुळे या व्यायाम करणाऱ्या दोन तरुणांना या पत्र्याचा धक्का लागला आणि यातच या दोन तरुणांचे हात कापले गेले आहेत.. या दोन तरुणांवर सध्या मलकापूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तत्काळ जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.. या घटनेमुळे पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे..या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *