महत्वाच्या घडामोडी

ज्योत आणण्यासाठी निघालेल्या दोन तरुणांवर काळाचा घाला ….काळीज हेलावणारी घटना ,पहा व्हिडीओ

बीड

नवरात्र उत्सवासाठी आई तुळजाभवानीची ज्योत आणण्यासाठी गेलेल्या दोन तरुनांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे .दरवर्षी प्रमाने मंडळाचे कार्यकर्ते ज्योत आणण्यासाठी तुळजापुरकडे जात असताना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील उपसरपंच अमोल सुरेश खिलारे आणि आरोग्य सेवक महेश भोसले यांच्या गाडीला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली

हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे .अपघात करून ते वाहन तिथून पसार झाले आहे ,ऐन सनात ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे गावात सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरले ही बातमी कळताच सर्व गावकरी एकत्र जमा झाले होते.प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते .या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *