महत्वाच्या घडामोडी

दोन जुळ्या बहिणींनी केलं जुळ्या भावांशी लग्न…

प्रतिनिधी / पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालच्या बर्दवानच्या कुरुमुन गावात एक अजब प्रकार घडला आहे.. येथे जुळ्या बहिणींनी जुळ्या भावांसोबत लग्न केले आहे.. अर्पिता आणि परमिता असे या जुळ्या बहिणींची नावे असून लव आणि कुश असे जुळ्या भावांची नावे आहेत..

अर्पिता ही काही वेळाच्या अंतराने परमिता पेक्षा मोठी आहे.. परंतु लहानपणापासून दोघींचं शिक्षण, सोबत फिरणे, मोठे होणे सगळ काही सोबतच झालं.. दोघींनी पदवी पर्यंतचे शिक्षणही एकाच कॉलेजमधून घेतले आहे..

अर्पिता आणि परमिता दोघीही बालपणापासून सोबत वाढल्या, त्यामुळे त्यांनी आमचं लग्नही एकाच घरात व्हावं अशी इच्छा आपल्या आई – वडिलांनकडे व्यक्त केली.. त्यानंतर आई – वडिलांनी आपल्या जुळ्या मुलींसाठी जुळ्या मुलांचा शोध घेण्यास सुरवात केली..

अर्पिता आणि परमिता दोघीही एका स्थानिक फॅक्टरीमध्ये काम करतात.. योगायोगाने दोन्ही मुलींचे वडील गौरचंद्र संतरा यांना कुरमुन गावात लव पाकरे आणि कुश पाकरे असे दोन जुळे भाऊ भेटले.. त्यांचे कुटुंबीयही आपल्या दोन जुळ्या मुलांसाठी मुली शोधत होते..

त्यानंतर अर्पिता आणि परमिता या दोघींच्या वडिलांनी लव आणि कुश यांच्या कुटुंबीयांकडे लग्नाची मागणी घातली आणि लव व कुश यांच्या कुटुंबियांनाही खूप आनंद झाला.. यानंतर हे लग्न जमले आणि एकाच मांडवात रीतिरिवाजाप्रमाणे हे लग्न पार पडले..

या लग्नात लव आणि कुश या जुळ्या भावांनी निळ्या रंगाचा पायजमा – कुर्ता घातला आहे तर अर्पिता आणि परमिता या दोन जुळ्या बहिणींनी लाल रंगाची साडी घातली आहे.. सध्या या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरु आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *