महत्वाच्या घडामोडी

कॉलेज कॅन्टीनमध्ये समोर आल्या दोन मुली.. तेव्हड्यात घडलं असं काही…

प्रतिनिधी / बंगळुरू

सध्या सोशल मिडीयावर बंगळुरूच्या दयानंद सागर इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅन्टीनमधील हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.. या व्हिडीओमध्ये दोन विद्यार्थीनींमध्ये काही शुल्लक कारणावरून वाद झाल्याचे दिसत आहे..

हे भांडण नेमके कोणत्या कारणावरून झाले आहे हे अद्याप समजू शकले नाही.. वजन काट्यावर एक तरुणी उभी असताना दुसरी तरुणी मागून येते आणि मग ही लढाई सुरु होते.. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.. या प्रकारामध्ये गंभीर बाब अशी की अन्य विद्यार्थी भांडण सोडवण्याऐवजी आरडाओरडा करून त्यांना प्रोत्साहन देत आहेत.. हा व्हिडीओ पाहून कॉलेजचे सुरक्षा रक्षक काय झोपा काढत होते का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *