महत्वाच्या घडामोडी

दोन भावांनी मिळून बनवली अफलातून बाईक…

प्रतिनिधी / मेरठ

आजकाल पेट्रोलच्या सततच्या वाढीमुळे बाईक आणि कार चालकांमध्ये नाराजी व्यक्त होताना आपण पाहतो.. त्यामुळे आजकाल इलेक्ट्रिक वाहनांनकडे ग्राहकांचा जास्त कल दिसून येत आहे.. मात्र उत्तर प्रदेशातील मेरठ मध्ये राहणाऱ्या दोन भावांनी एक ई – बाईक बनवली आहे.. ही बाईक सिंगल चार्जिंगमध्ये १५० किलोमीटर धावते..

अक्षय ( वय – १६ ) आणि आशिष ( वय – २१ ) अशी या दोन भावांची नावे आहेत.. या ई – बाईकला चार्ज करण्यासाठी फक्त ५ रुपये मोजावे लागतात.. अक्षय व आशिष हे दोघे सख्खे भाऊ आहेत.. अक्षय हा पॉलिटेक्निकचा विद्यार्थी असून आशिष हा एमएचे शिक्षण घेत आहे..

अक्षय आणि आशिष ने ही बाईक बनवण्यासाठी विविध ठिकाणांहून सुटे पार्ट व काही नवीन तर काही जुन्या वस्तू एकत्र करून ही ई – बाईक तयार केली आहे.. ही बाईक तयार झाली तेव्हा लोक तिला रॉकेट किवा मिसाईलसारखी दिसते असे म्हणायचे, म्हणून या बाईकचे नाव ‘तेजस’ ठेवण्यात आले आहे..

अक्षय आणि आशिष ने जेव्हा वडिलांकडे बुलेट मोटारसायकल ची मागणी केली तेव्हा वडील म्हणाले की बुलेटकडे कोण पाहतय, त्यानंतर या दोन भावंडानी ठरवले की, आपण अशी एक बाईक बनवावी की जिच्याकडे प्रत्येकाने पाहिले पाहिजे.. आणि त्यांनी ही ई – बाईक बनवण्याचा निर्णय घेतला..

ही ई – बाईक बनवण्यासाठी अक्षय आणि आशिषला ३५००० रुपये खर्च आला आहे.. या ई – बाईकची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी ७ तास लागतात.. बॅटरी चार्ज होण्यासाठी सुमारे एक युनिट वीज वापरली जाते.. म्हणजेच या बाईकची बॅटरी अवघ्या ५ रुपयात चार्ज होते..

ही ई – बाईक पूर्ण चार्ज झाल्यावर १५० किमी प्रवास करू शकते.. बाईकमध्ये स्पीड वाढवण्यासाठी एक बटनही देण्यात आले आहे.. आता या ई – बाईककडे सगळेजण बघतात आणि या बाईकबद्दल विचारतातही.. त्यामुळे अक्षय आणि आशिष यांना आपण ही बाईक बनवल्याचा खूप आनंद होतो.. यामुळे या दोन भावंडांचे सर्वत्र कौतुक होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *