महत्वाच्या घडामोडी

मिटक्या मारत पाणीपुरी खातोय हा कुत्रा.. पाहा हा व्हायरल व्हिडीओ…

प्रतिनिधी / व्हायरल

पाणीपुरी म्हणल की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं.. अनेकांना पाणीपुरी खूप आवडते.. कमी पैशात काहीतरी चटपटीत खाव वाटत असेल तर पाणीपुरीशिवाय दुसरा पर्याय नाही.. त्यामुळे पाणीपुरी आवडणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे..

काहीजण तर एकदिवसाआड पाणीपुरी खाण्याचा आस्वाद घेत असतात.. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.. या व्हिडीओमध्ये एका महिलेने चक्क त्यांच्या कुत्र्याला पाणीपुरी खाऊ घातली आहे..

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक पाणीपुरीचा गाडा दिसत आहे.. एक महिला पाणीपुरी खाण्यासाठी तिच्या पाळीव कुत्र्याला सोबत घेऊन आली आहे.. तिने पाणीपुरी खाल्ली का नाही माहित नाही, पण आपल्या कुत्र्याला मोठ्या प्रेमाने ही महिला पाणीपुरी खाऊ घालत आहे..

या कुत्र्यानेही आवडीने दोन – तीन पाणीपुरी खाल्ल्या आणि उरलेले आंबट – गोड पाणी मिटक्या मारत पिऊन टाकले.. यावेळी ही महिला आपल्या कुत्र्याकडे मोठ्या आनंदाने आणि कौतुकाने पाहत होती.. हा व्हिडीओ पाहून काहींनी त्याचे कौतुक केले आहे तर काहींनी यावर टिका केली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *