महत्वाच्या घडामोडी

घटस्फोटीत पुरुषांसाठी जंगी पार्टी ! निमंत्रणपत्रिका व्हायरल…

प्रतिनिधी / भोपाळ

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे एका संस्थेने अनोखा कार्यक्रम आयोजित केला आहे.. १८ पुरुषांना दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर संघर्षानंतर घटस्फोट मिळाल्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.. त्याचबरोबर त्यांना घटस्फोट मिळण्यासाठी भरपूर प्रमाणात पोटगीही द्यावी लागली असल्याची माहिती समोर आली आहे..

संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.. हा कार्यक्रम भाई वेलफेअर सोसायटी या खासगी संस्थेने आयोजित केला असून ही संस्था २०१४ पासून नोंदणीकृत आहे.. जे पुरुष घटस्फोट घेऊ इच्छितात अशा पुरुषांसाठी ही संस्था काम करते.. या संस्थेकडून घटस्फोटीत पुरुषांसाठी हेल्पलाईन चालवली जाते.. या संस्थेने (विवाह विसर्जन समारंभ) नावाचा कार्यक्रम भोपाळ शहराच्या बाहेर असलेल्या एका रिसॉर्टमध्ये १८ सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे अशी माहिती या संस्थेच्या अधिकाऱ्याने दिली आहे.. या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *