महत्वाच्या घडामोडी

दहीहंडी उत्सवात नाचता नाचता गोविंदासोबत घडलं असं काही…

प्रतिनिधी \दापोली

संपूर्ण राज्यात काल दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच गोविंदा पथकांकडून एकावर एक थर रचून दहीहंडी फोडण्यात येत होत्या. मात्र, एकीकडे दहीहंडी उत्साहात साजरी करत असताना दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली आहे. दापोली येथे पाज पंढरी गावातील एका गोविंदाचा नाचताना मृत्यू झाला आहे.

वसंत लाला चौगुले असं मृत झालेल्या गोविंदाचं नाव आहे. दापोली तालुक्यातील हर्णे पाज पंढरी या गावात कोळी समाजातर्फे दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या कार्यक्रमात चौगुले यांनीही सहभाग घेतला होता.

अचानक नाचत असताना चौगुले यांच्या छातीत कळ आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले

दरम्यान, अचानक नाचत असताना चौगुले यांच्या छातीत कळ आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. काल राज्यभरात दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात असताना, ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती समजताच पंचक्रोशीतील गोविंदांवर दुःखाचे सावट पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *