महत्वाच्या घडामोडी

अवघ्या दहा दिवसांपूर्वीच जन्मलेल्या आपल्या मुलाचे तोंड बघून येत असताना जवानासोबत घडलं असं काही…

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अकीवाट या गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.. अवघ्या दहा दिवसांपूर्वी जन्मलेल्या लेकराचे तोंड बघून घरी येत असताना जवान शीतल कल्लाप्पा कोळी ( वय – २९ ) यांचे अपघाती निधन झाले आहे..

अकीवाटमधील १५ मराठा बटालियनचे जवान शीतल कोळी यांच्या पत्नीला अवघ्या १० दिवसांपूर्वीच मुलगा झाला आहे.. त्यानंतर ते आपल्या गावी अकीवाट येथे आले होते.. शीतल कोळी हे आपल्या मुलाला पाहण्यासाठी सांगली जिल्ह्यातील माळवाडी – सावळवाडीत सासरवाडीला गेले होते..

शीतल कोळी आपल्या लेकराला पाहून घरी परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.. कुरुंदवाड मजरेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर ट्रॅक्टर आणि मोटारसायकलची धडक होऊन जवान शीतल कोळी हे गंभीर जखमी झाले.. त्यानंतर त्यांना सांगली येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले..

मात्र उपचारादरम्यान शीतल कोळी यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.. जवान शीतल कोळी हे आठ वर्षापासून सैन्य दलात नायक पदावर कार्यरत होते.. रात्री उशिरा त्यांच्यावर लष्करी इंतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत..

जवान शीतल कोळी यांच्या पश्चात आई – वडील, भाऊ, विवाहित बहिण, पत्नी, दोन वर्षाचा व दहा दिवसाचा अशी दोन मुले आहेत.. शीतल कोळी यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.. परिसरातही शोककळा पसरली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *