महत्वाच्या घडामोडी

पंढरपुरात Gas सिलेंडरचा स्फोट ! घर जळून खाक…

पंढरपूर तालुक्यातील देगाव या गावात रात्री १० वाजताच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली असून, यात ०४ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे..

बबन कन्हैय्यालाल भुई यांच्या घरी सदर घटना घडली आहे.. भुई यांचे देगाव येथे पत्र्याचे घर आहे.. गावातच एकाचा वाढदिवस असल्याने घरातील सगळे तिकडे गेले होते, त्यावेळेसच घरात अचानक सिलेंडरचा स्फोट झाला, त्यामुळे घराला आग लागली, ही आग इतकी तीव्र होती कि, घराचा पत्रा जळून खाक झाला..

आगीची घटना समजताच गावकऱ्यांनी घटना स्थळी मोठी गर्दी केली.. आगीची तीव्रता जास्त असल्याने घरातील संसारोपयोगी कोणतेच साहित्य बाहेर काढता आले नाही.. दारात बांधलेल्या चार शेळ्या या घटनेत मृत पावल्या.. सुदैवाने सगळेजण वाढदिवसानिमित्त बाहेर असल्याने सगळ्यांचा जीव वाचला.. या घटनेमुळे देगाव परिसरात रात्री काही वेळ तणावाचे वातावरण होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *