महत्वाच्या घडामोडी

धक्कादायक ! नातवानेच संपवले आज्जीचे जीवन…

प्रतिनिधी / नाशिक

आजी आणि नातू या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना आज नाशिकमध्ये घडली आहे. हरसूलच्या इंदिरानगरमध्ये ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. नातवाचे हवे ते लाड करणाऱ्या आणि लहानपणी अंगा खांद्यावर खेळणाऱ्या नातवानेच आपल्या आजीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गंगूबाई गुरव असं या मृत आजीचं नाव आहे. काही काम धंदा करत नाही, नुसतं बसून खातो.. या आजीच्या बोलण्याचा नातवाला राग आला आणि त्याने आपल्या आजीला मारहाण करण्यास सुरवात केली, यातच ७० वर्षीय आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी त्र्यंबक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आजीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

मंगळवारी सकाळी ही घटना घडली असून आरोपी नातवाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आजी आणि नातवाच्या भांडणात नातवाने आजीला केलेल्या मारहाणीत आजीच्या उजव्या डोळ्याला गंभीर जखम झाली होती, आणि त्यातच गंगूबाई गुरव यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. परिसरातही सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *