महत्वाच्या घडामोडी

कौतुकास्पद ! भर पावसात कॉलेजच्या पोरांनी गटारातील कुत्र्याला काढले बाहेर…

प्रतिनिधी / व्हायरल

सध्याच्या आधुनिक युगात आपण पाहतो की, कोणीही कोणाची मदत करत नाही.. आपल्याला अनेकवेळा सांगितले जाते की एखाद्या व्यक्तीला किंवा मुक्या प्राण्याला मदत करावी, परंतु आजच्या युगात असे घडत नाही.. पण आत्ताही कुठेतरी माणुसकी शिल्लक आहे.. सध्या असाच एक कॉलेजच्या पोरांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे..

या कॉलेजच्या पोरांनी एका कुत्र्याला गटारातून बाहेर काढले आहे.. या व्हिडीओमध्ये पाऊस सुरु आहे.. आणि रस्त्याच्या कडेला काही मुले उभी असलेली दिसत आहेत.. थोड्या वेळाने रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारातून एका कुत्र्याला बाहेर काढताना कॉलेजची पोर दिसत आहेत..

ही कॉलेजची पोरं या कुत्र्याला रस्ता ओलांडून देताना दिसत आहेत.. हा कुत्रा जखमी अवस्थेत असल्याचं दिसत आहे.. हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून अनेकांनी या कॉलेजच्या पोरांचे कौतुक केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *