महत्वाच्या घडामोडी

खेळता खेळता चिमुकल्याने पाहा काय गिळले, एक्सरे पाहून धक्का बसेल…

प्रतिनिधी / बुलढाणा

बुलढाण्याच्या शेगाव एक धक्कादायक घटना घडली आहे.. येथे एका चिमुकल्याचा श्वास अडकल्याने डॉक्टरांकडे नेले असता एक धक्कादायक बाब समोर आली आहे.. आमीर मोहम्मद ( वय -३ वर्ष ) असे या चिमुकल्याचे नाव आहे..

आमीरच्या हाताला खेळता खेळता एक रुपयांचं नाणं लागलं.. त्याला वाटले ही खायची वस्तू आहे, म्हणून ते एक रुपयांचं नाणं आमीरने तोंडात टाकलं.. यावेळी आई – वडिलांचे आमीरकडे लक्ष नव्हते.. नाणं गीळल्यामुळे आमीरला श्वास गुदमरला होता..

या घटनेनंतर आमीरच्या आई – वडिलांनी त्वरित आमीरला डॉक्टरांकडे नेले.. नाणं आमीरच्या पोटात न जाता श्वसन नलीकेजवळ अडकलं होतं.. एक्सरे रिपोर्ट पाहून आमीरच्या आई – वडीलांनाही धक्का बसला.. एक्सरे रिपोर्ट पाहून डॉक्टरांच्याही ही केस साधीसुधी नाही, हे लक्षात आले..

या तीन वर्षाच्या चिमुकल्याला होणारा त्रास पाहून डॉक्टरांनाही अखेर हे नाणं बाहेर काढण्याशिवाय पर्याय नव्हता.. अखेर फोलिज कॅथेटरच्या सहाय्याने हे नाणं तात्काळ बाहेर काढण्याचा डॉक्टरांनी प्रयत्न केला.. आणि या बाळाचा जीव थोडक्यात वाचला आहे.. हे नाणं बाहेर काढल्यानंतर आमीरच्या आई – वडिलांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.. त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *