महत्वाच्या घडामोडी

ट्रेनच्या अप्पर सीटवरून खाली येण्यासाठी या चिमुकल्याची ‘टेक्निक’ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल…

प्रतिनिधी / व्हायरल

आपण पाहतो की लहान मुलांशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात.. या सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही वेळेला या मुलांच्या गोष्टी मजेशीर असतात तर काही मुले असे काहीतरी करतात की, ते पाहून सर्वजण आश्चर्यचकित होतात..

सध्या असाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.. हा चिमुकला ट्रेनच्या वरच्या सीटवरून कसलाही आधार न घेता खालच्या सीटवर उतरत आहे.. हा व्हिडीओ पाहून असे वाटते की लहान मुलांना सोबत घेऊन प्रवास करणे त्यांच्या पालकांना थोडे कठीणच असते..

लहान मुलांना प्रवासात सहसा एका जागेवर बसायला आवडत नाही.. असेच काही या व्हिडीओमधल्या मुलासोबत घडले असावे.. कारण हा मुलगा ट्रेनच्या वरच्या सीटवर बसला आहे आणि त्याला खाली उतरायचे आहे.. परंतु त्याचे कोणी ऐकत नव्हते..

त्यानंतर हा चिमुकला स्वतःच एका सीटवरून दुसऱ्या सीटवर आणि दुसऱ्या सीटवरून तिसऱ्या सीटवर उतरताना दिसत आहे.. इतक्या लहान वयात असं सीटवरून खाली उतरणे सोपे नाही मात्र हा मुलगा अगदी सहजपणे खाली उतरताना दिसत आहे..

या चिमुकल्याचा हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटले आहे तर अनेकांनी हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.. काहींनी तर हा तेथे उपस्थित असलेल्या लोकांचा निष्काळजीपणा आहे असे म्हणले आहे.. चुकून जर त्या मुलाला काही झाले असते तर, त्या मुलाला दुखापत होऊ शकली असती अशीही प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *