महत्वाच्या घडामोडी

या चिमुकल्याचे एक्स्प्रेशन्स पाहून तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल.. पाहा हा व्हिडीओ…

प्रतिनिधी / व्हायरल

सोशल मिडीयावर अनेकदा लहान मुलांचे क्यूट व्हिडीओ शेअर होत असतात.. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.. या चिमुकल्याचे एक्स्प्रेशन पाहून क्यूट हा एकच शब्द तुमच्या तोंडून निघेल..

ब्रिटीशकालीन मुंबईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे लोकप्रिय साधन म्हणून ट्राम ओळखली जायची.. या व्हायरल व्हिडीओमधील चिमुकला पहिल्यांदाच ट्राममध्ये बसला आहे.. या ट्रामचा प्रवास अनुभवताना त्याने जे चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन दिले आहेत ते पाहून लोक त्याच्या प्रेमात पडू लागले आहेत.. या व्हिडीओमध्ये हा चिमुकला अतिशय उत्साही दिसत आहे..

या व्हिडीओमध्ये हा चिमुकला त्याच्या वडिलांच्या शेजारी बसला असून, इकडे तिकडे पाहिल्यानंतर अचानक तो दिलखेचक स्माईल करताना दिसतो आहे.. हा व्हिडीओ या मुलाची आई मिशेल बाओ यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या चिमुकल्याच्या एक्स्प्रेशनचे कौतुक केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *