महत्वाच्या घडामोडी

चिमुकल्यासह आईने घेतली इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी.. म्हणाली देवाघरी जायचे आहे…

प्रतिनिधी / नवी मुंबई

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.. येथे एका पाच वर्षाच्या मुलासह आईने सात मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे.. यात आईचा जागीच मृत्यू झाला असून पाच वर्षाच्या मुलाला उडी मारताना आईने कवटाळून धरल्याने त्याचे प्राण वाचले आहे..

आरती मल्होत्रा ( वय – ३९ ) असे या मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.. तर अर्विक ( वय – ०५ वर्ष ) हा मुलगा वाचला आहे.. कोपरखैरणे सेक्टर २० येथील न्यू रावची इमारतीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे.. अर्पिताचे लग्न चार वर्षांपूर्वी विजेंद्र मल्होत्रा याच्याशी झाले होते..

लग्न झाल्यानंतर पती , सासू आणि नणंद यांच्याकडून आरतीचा सतत छळ चालू होता.. आरतीची नणंद ही सतत सासू – सुनेत भांडणाची ठिणगी टाकत होती.. आरतीने हा सगळा प्रकार आपल्या आईला व भावाला सांगितला होता..

या अगोदरही एकदा आरतीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.. परंतु भावाने समजूत काढत तिला धीर दिला होता.. त्यानंतर ही आरतीचा तसाच छळ सुरु राहिला.. तिला माहेरच्या व्यक्तींना भेटण्यासही मनाई केली होती..

त्यानंतर सासरच्या त्रासाला कंटाळून आरतीने आपल्या पाच वर्षाच्या मुलासोबत इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.. त्यामध्ये आरतीचा जागीच मृत्यू झाला असून मुलगा थोडक्यात बचावला आहे.. त्याच्या हाता पायाला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत..

उपचारादरम्यान आरतीचा भाऊ अर्विक याला भेटायला गेला असता त्याने मामला सांगितले की, आई रडत होती, म्हणाली देवाघरी जायचे आहे.. आणि आम्ही इमारतीवरून उडी मारली.. या घटनेनंतर आरतीचा भाऊ विशाल शर्मा याने सासरच्या मंडळींच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.. त्यानंतर पोलिसांनी सासरच्यांवर गुन्हा दाखल करून पती विजेंद्रला अटक केली आहे.. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *