महत्वाच्या घडामोडी

सात दिवसाच्या चिमुकलीसोबत वडिलांनी केलं असं काही , मन सुन्न करणारी घटना…

प्रतिनिधी / गोंडपिपरी

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील शिर्शी बेरडी येथे राहणारा कुमोद पौरकार याचे लग्न विठ्ठलवाडा येथे राहणाऱ्या भाग्यश्री देवतळे हिच्याशी झाले होते.. त्यांचा संसार आनंदाने सुरु होता.. सात दिवसांपूर्वीच भाग्यश्रीने एका मुलीला जन्म दिला.. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर भाग्यश्री ही आपल्या मुलीसह माहेरी विठ्ठलवाडा या गावात आली.. मुलगी झाल्याच्या आनंदाने बाप कुमोद पौरवार हा आपल्या मुलीला बघण्यासाठी विठ्ठलवाडा येथे आपल्या सासरी आला..

त्याने चिमुकलीला घेतले आणि खेळवायला लागला.. मात्र, अचानक खेळवत असताना तो मुलीला घेऊन पळू लागला.. सुरवातीला घरच्यांना काहीच समजले नाही.. चिमुकली व बाप दिसत नसल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरु केली.. काही गावकऱ्यांनीही पाठलाग करण्यास सुरवात केली.. सासरची मंडळी आपल्या मागे लागली आहे हे समजताच कुमोद कौरवार या बापाने आपल्या मुलीला खाली फेकले व तेथून पळ काढला.. गावकऱ्यांनी त्याला पकडले आहे व ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवले आहे.. मुलीला खाली फेकल्याने ती गंभीर जखमी झाली असता तिला गोंडपिपरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.. मुलीची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर आली आहे.. हे असे कृत्य बापाने का केले असावे हे अद्याप समजू शकले नाही.. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *