महत्वाच्या घडामोडी

वायपर खराब होताच बस ड्रायव्हरने लढवली भारीच शक्कल.. पाहा हा व्हिडीओ…

प्रतिनिधी / उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशातील मेरठमधील रोडवेज बसच्या खराब स्थितीवर एका ड्रायव्हरने केलेल्या जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.. सध्या पावसामुळे चारचाकी वाहनांना वायपरची गरज असते.. या बस ड्रायव्हरने बसचा वायपर खराब झाल्याने असा काही जुगाड केला आहे की, तो पाहून लोकं थक्क झाली आहेत..

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बस चालकाने अतिशय साध्या पद्धतीने खराब वायपर चालवण्याची सोपी युक्ती केली आहे.. पावसात या वायपरचा वापर करण्यासाठी बस चालकाने दोरी आणि प्लास्टिकच्या बॉटलचा वापर केला आहे..

या विडीओमध्ये आपण बघू शकता की, विंडशिल्डला लावलेल्या वायपर सोबत असलेल्या दोरीच्या सहाय्याने लटकत असलेली बॉटल दिसत आहे.. बसचा ड्रायव्हर दोरीवरून वायपर ओढताच ती बॉटलच्या वजनाने आहे त्या जागेवर पुन्हा येते.. या जुगाडामुळे वायपरमध्ये बिघाड होऊनही बस चालकाला पावसात बसची काच व्यवस्थित साफ करता येते.. हा व्हिडीओ पाहून सोशल मिडीयावर या बस चालकाचे कौतुक होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *