महत्वाच्या घडामोडी

धक्कादायक ! एस टी बसचे ब्रेक फेल झाल्याने घडला विचित्र अपघात…

प्रतिनिधी / नाशिक

नाशिक – पुणे महामार्गावरील नाशिक पासून तीन किमी अंतरावर एका एस टी बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे नाशिक येथील शिंदे पळसे गावाच्या हद्दीत या बसने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली आहे..

या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.. हा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी असलेल्या बसला भीषण आग लागली.. त्यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे..

बसला आग लागल्यानंतर बसमध्ये असणाऱ्या काही प्रवाशांचा होरफळून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दल, पोलीस प्रशासन तसेच रुग्णवाहिका दाखल झाली असून आठ ते दहा लोकांना जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे..

या अपघातात जखमी झालेल्या लोकांवर बिटको हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत.. तर गंभीर जखमी झालेल्या लोकांना नाशिक येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *