महत्वाच्या घडामोडी

घागरा – चोली अन डोक्यावर पदर ! पाहा बुलेट चालवणाऱ्या महिलेचा हटके अंदाज…

प्रतिनिधी / व्हायरल

आजच्या युगात महिला रस्त्यावर दुचाकी चालवताना दिसणे अगदी सामान्य गोष्ट आहे.. आजकाल महिला सलवार – सूट आणि साडी घालूनही मोटारसायकल चालवताना दिसतात.. सध्या सोशल मिडीयावर अशाच एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे..

या व्हिडीओमध्ये ही महिला पारंपारिक पोषाखामध्ये बुलेट चालवताना दिसत आहे.. या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये ही महिला सुसाट बुलेट चालवताना दिसत आहे.. मात्र बुलेट चालवतानाही तिच्या डोक्यावरचा पदर ती सरकू देत नाही..

या पारंपारिक वेशातील या बुलेट राणीच्या चेहऱ्यावर हसूही फुलले आहे.. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ही महिला बुलेट चालवत आहे.. तिच्यामागे दुसरी महिला बसली आहे.. विशेष म्हणजे या दोघींनी लेहंगा – चोली घातली आहे.. आणि डोक्यावर पदरही घेतला आहे..

बुलेट चालवणाऱ्या महिलेने केशरी चोली आणि हिरव्या रंगाचा लेहंगा घातला आहे व डोक्यावर केशरी रंगाची ओढणी घेतली आहे.. तर मागे बसलेल्या दुसऱ्या महिलेने काळ्या रंगाची चोली आणि निळ्या रंगाचा लेहंगा घातला आहे व डोक्यावर गुलाबी रंगाची ओढणी घेतली आहे..

हा सोशल मिडीयावर व्हायरल होणारा ‘ बुलेट राणी ‘ चा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी या महिलेचे कौतुक केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *