महत्वाच्या घडामोडी

लहान भावाच्या अपघाती मृत्युच्या धक्क्याने बहिणीनेही सोडले प्राण…

प्रतिनिधी / वर्धा

बहिण भावाच नात हे नेहमीच जिव्हाळ्याचं आणि आपुलकीच मानलं जातं.. एकमेकांचे सुख दुःख वाटून घेण्यासाठी बहिण भाऊ नेहमीच तयार असतात. आपला भाऊ हे जग सोडून गेल्याच समजताच, हा धक्का सहन न झाल्याने बहिणीनेही आपले प्राण सोडल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना वर्धा जिल्ह्यात घडली आहे.

सिंदी जिल्यातील रेल्वे परिसरात इकबाल किफायत शेख (वय -३५ ) या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. भावाच्या निधनाचे वृत्त कळताच आजारी असलेल्या बहिणीचाही मृत्यू झाला आहे. परविन किफायत शेख (वय -४० ) असे या बहिणीचे नाव आहे.

इकबाल हा नागपूर येथे मार्केटिंगचे काम करतो. मंगळवारी नेहमीप्रमाणे तो आपल्या दुचाकीवरून नागपूरहून सिंदी कडे येण्यासाठी निघाला असता धवल पेठ पुलापुर्वी एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली.. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

आपल्या भावाच्या अशा आकस्मित निधनाची बातमी समजताच आजारी असलेल्या बहिणीला चांगलाच धक्का बसला व हा धक्का सहन न झाल्याने तिनेही जागीच आपले प्राण सोडले.. या घटनेने शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *