महत्वाच्या घडामोडी

परदेशी असलेल्या लेकाला वाढदिवसाच्या दिवशी अचानक पाहून वडील भावूक.. पाहा हा व्हिडीओ…

प्रतिनिधी / व्हायरल

आजकाल इंटरनेटवर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.. त्यापैकी काही व्हिडीओ क्षणात मनाला भिडतात आणि भावूकही करतात.. असाच एक भावूक करणारा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे..

या व्हायरल व्हिडीओ मध्ये बाप-लेकाचे प्रेम पाहून तुमचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत.. या व्हिडीओमध्ये एक मुलगा टेबल कडे जाताना दिसत आहे.. जिथे त्याचे वडील त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंबासोबत बसले आहेत..

तेव्हड्यात दुसऱ्या व्यक्तीने वडिलांचे डोळे झाकले आहेत आणि मुलाने वडिलांना सरप्राईज दिले आहे.. आनंदाने आणि भारावून गेलेल्या वडिलांनी मुलाकडे धाव घेत त्याला घट्ट मिठी मारली आहे.. या क्षणाने प्रत्येकाला भारावून टाकले आहे.. बाप-लेकाच्या नात्याचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यांचे गोड कौतुक केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *