महत्वाच्या घडामोडी

बोहल्यावर चढण्याआधी नवरीने पाळीव कुत्र्यासोबत पाहा काय केले…

प्रतिनिधी / व्हायरल

आपण पाहतो की ज्यांच्याकडे पाळीव कुत्रा किंवा मांजर असते त्यांना आपल्या प्राण्यांविषयी खूप प्रेम असते.. ते आपल्या मुलाप्रमाणे या प्राण्यांचा सांभाळ करत असतात.. आणि प्राणीही त्या कुटुंबातील व्यक्तींना तितकाच जीव लावतात..

आपण आपल्या प्राण्यांचे आंघोळ घालणे, जवळ झोपवणे, फिरायला नेणे, तसेच त्याला खाऊ घालणे असे खूप लाड पुरवत असतो.. असाच एक प्राण्यांवर प्रेम व्यक्त करणारा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे..

या व्हिडीओतील तरुणीचे आपल्या कुत्र्यावर असलेले प्रेम पाहून अजबच म्हणावे लागेल.. ही तरुणी आपल्या लग्नादिवशीही आपल्या पाळीव कुत्र्याला खाऊ घालताना दिसत आहे.. लग्न हा आपल्या आयुष्यातील खूप महत्वाचा क्षण असतो..

लग्नादिवशी विधी, मेकअप आणि इतरही असंख्य गोष्टी असतात त्यामुळे आपण पूर्ण भांबावून गेलेलो असतो.. मात्र या व्हिडीओतील नवरी आपल्या पाळीव कुत्र्याला भूक लागलेली असताना मेकअप अर्धवट सोडून खायला भरवत आहे..

या व्हायरल व्हिडीओत प्रण्याबाबतचे प्रेम व्यक्त केले असून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.. या व्हिडीओळा अनेकांनी लाईक केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *