महत्वाच्या घडामोडी

भयानक ! भीषण अपघातात आई – वडिलांसह चिमुकल्याचा दुर्दैवी अंत…

प्रतिनिधी / पुणे

दौंड तालुक्यातील पाटस ते कारखाना या अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. संतोष सदाशिव साबळे, रोहिणी संतोष साबळे आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा गुरु साबळे अशी मृत झालेल्या तिघांची नावे आहेत..

पाटस येथील रहिवासी असलेले संतोष साबळे हे आपल्या कुटुंबीयांसोबत कुसेगाव येथील श्री भानोबा देवाचे दर्शन घेऊन घरी परतत असताना पाटस येथे विश्वशांती बुद्ध विहार येथील कॅनॉलवरील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीसमोर मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने संतोष यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली..

ही धडक इतकी जोरात होती की दुचाकीवर असलेल्या संतोष यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचाही जागीच मृत्यू झाला आहे.. साबळे कुटुंबावर अचानक काळाने झडप घातल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *