महत्वाच्या घडामोडी

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले..

राज्यात अतिवृष्टीची स्थिती लक्षात घेऊन जुलै महिन्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य सहकारी प्राधिकरणाने आहे त्या स्थितीत स्थगित केला होता, मात्र आता राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने ज्या निवडणुका स्थगित केल्या होत्या, त्याच टप्प्यापासून या निवडणुका घेण्याचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे..

त्यानुसार मोहोळ तालुक्यातील टाकली सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम पुन्हा तीन महिन्यानंतर आहे त्या स्थितीपासून पुढे सुरु झालेला आहे.. अर्ज मागे घेण्याची मुदत तीन दिवस बाकी असताना भीमा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता..

त्यामुळे ०१ ते ०३ नोव्हेंबर पर्यंत तीन दिवस अर्ज मागे घेण्याची मुदत असून १३ नोव्हेंबर २०२२ रोजी भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान होणार आहे.. तर १४ नोव्हेंबर २०२२ रोजी भीमा कारखान्याची मतमोजणी होणार आहे..

विद्यमान चेअरमन खा.धनंजय महाडिक यांच्यासह विरोधी गटातून माजी आमदार राजन पाटील हे भीमा च्या निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत… तर पंढरपुरचे श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *