महत्वाच्या घडामोडी

भीमेला येणार महापूर ? एकूण १,३५,००० चा विसर्ग येणार नदीत ….

पुणे आणि सातारा परिसरात सुरु असलेल्या परतीच्या पावसाळे उजनी धरण आणि वीर धरण  ओव्हरफ्लो झाले असून उजनीतून भीमा नदीत 91600 तर वीर धरणातून नीरा नदीत 43733 क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने पंढरपूर  शहरासह 46 गावांना पुराचा धोका वाढला आहे.परिस्थितीमुळे प्रशासनाने आपली आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली असून सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सध्या चंद्रभागेतून हा 1 लाख 5 हजार क्युसेक विसर्ग पोहोचल्यानंतर परिस्थिती अवघड बनण्यास सुरुवात होणार असून चंद्रभागेतून 1 लाख 10 हजार क्युसेक विसर्गाने पाणी आल्यास शहरातील व्यास नारायण, बडवे चर या झोपडपट्टीत पाणी शिरण्यास सुरुवात होते. याच्यासोबत सरकोली, पटवर्धन कुरोली, उंबरे पागे सारख्या ग्रामीण भागातील आठ गावात देखील पाणी शिरण्यास सुरुवात होते. यासाठी प्रशासनाने तब्बल लाखभर लोकांना पुनर्वसन करण्याची तयारी ठेवली आहे.

उजनी, वीर धरण 100 टक्के भरलं; चंद्रभागेचं पाणी नदीकाठच्या मंदिरांमध्ये, देव हलविण्यास सुरुवात

पंढरपूर तालुक्यात भीमा नदीच्या उजव्या तीरावर 13 तर डाव्या तीरावर 28 गावे आहेत. याशिवाय ओढे आणि नाल्यात हे नदीचे पाणी शिरुन धोका होणारी काही गावे असून एकूण 46 गावांना पुराचा धोका संभवू शकतो. सध्या प्रशासनाने कोळी बांधवांच्या होड्या सज्ज ठेवल्या असून आपत्कालीन यंत्रणापरिस्थितीमुळे प्रशासनाने आपली आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली असून सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सध्या चंद्रभागेतून हा 1 लाख 35 हजार क्युसेक विसर्ग पोहोचल्यानंतर परिस्थिती अवघड बनण्यास सुरुवात होणार असून चंद्रभागेतून 1 लाख 10 हजार क्युसेक विसर्गाने पाणी आल्यास शहरातील व्यास नारायण, बडवे चर या झोपडपट्टीत पाणी शिरण्यास सुरुवात होते. याच्यासोबत सरकोली, पटवर्धन कुरोली, उंबरे पागे सारख्या ग्रामीण भागातील आठ गावात देखील पाणी शिरण्यास सुरुवात होते. यासाठी प्रशासनाने तब्बल लाखभर लोकांना पुनर्वसन करण्याची तयारी ठेवली आहे

पंढरपूर तालुक्यात भीमा नदीच्या उजव्या तीरावर 13 तर डाव्या तीरावर 28 गावे आहेत. याशिवाय ओढे आणि नाल्यात हे नदीचे पाणी शिरुन धोका होणारी काही गावे असून एकूण 46 गावांना पुराचा धोका संभवू शकतो. सध्या प्रशासनाने कोळी बांधवांच्या होड्या सज्ज ठेवल्या असून आपत्कालीन यंत्रणा कामाला लागली आहे. कामाला लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *