महत्वाच्या घडामोडी

शहीद भावाच्या पुतळ्याला राखी बांधण्यासाठी ही बहिण ८०० किलोमीटरहून येते…

प्रतिनिधी / राजस्थान

भाऊ बहिणीचे प्रेम हे जगातील एक अनोखे प्रेम मानले जाते.. एक भाऊ आपल्या बहिणीसाठी संपूर्ण जगाशी लढायला तयार असतो.. बहिणही आपल्या भावावर खूप प्रेम करते आणि त्याला आधार देते.. खरोखरच भाऊ बहिणीचं नात हे खूप प्रेमळ असतं.. रक्षाबंधन हे भाऊ – बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतिक मानले जाते.. अशीच एक बहिण दरवर्षी रक्षाबंधनाला आपल्या शहीद भावाच्या पुतळ्याला राखी बांधण्यासाठी ८०० किलोमीटरचा प्रवास करते..

राजस्थानच्या फतेहपूरमधील या बहिणीचे नाव उषा कंवर असे आहे.. उषा या आपल्या शहीद भावाला राखी बांधण्यासाठी दरवर्षी ८०० किलोमीटरचा प्रवास करून येत असतात.. धरमवीर सिंह शेखावत असे या शहीद भावाचे नाव आहे.. धरमवीर शेखावत काश्मीरच्या लाल चौकात तैनात होते, तेथे २००५ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ते शहीद झाले होते.. त्यानंतर त्यांचा पुतळा फतेहपूर येथे बांधण्यात आला आहे..

धरमवीर सिंह शेखावत यांची बहिण उषा कंवर ही १७ वर्षांपासून अहमदाबादहून शहीद भावाच्या पुतळ्याला राखी बांधण्यासाठी येतात आणि रक्षाबंधनाचा सण साजरा करतात.. भाऊ देशसेवेसाठी शहीद झाला आहे, तो जीवंत नाही पण माझ्या हृदयात तो जिवंत आहे.. ‘भावासोबतचे प्रेमाचे नाते सदैव आपल्या हृदयात राहील’, असेही उषा म्हणतात..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *