महत्वाच्या घडामोडी

भाऊ असावा तर असा ! बहिणीला घासातला घास देणारा भाऊ.. पाहा हा व्हिडीओ…

प्रतिनिधी / व्हायरल

लहान मुलांचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात.. या व्हिडीओमध्ये लहान मुलांमधली निरागसता, त्यांचे अवखळ किस्से दाखवले जातात.. त्यांचा तो निष्पाप कोवळेपणा पाहून आपलाही मूड फ्रेश होतो..

सोशल मिडीयावर सध्या लहानपणी भावंडांमध्ये कसं निरागस प्रेम असत हे सांगणारा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.. या व्हिडीओमध्ये दोन लहान भावंडे दिसत आहेत.. साधारण भाऊ ९ ते १० वर्षाचा तर बहिन३ ते ४ वर्षाची आहे..

हे दोघे बहिण – भाऊ डायनिंग टेबलवर बसून जेवण करत आहेत.. जेवण करताना भावाचे लक्ष सगळे मोबाईल मध्ये आहे तर बहिण ही मन लावून एकाग्रतेने जेवण करत आहे.. जेवताना बाऊलमधला बिस्किटासारखा दिसणारा पदार्थ बहिण उचलते आणि खायला लागते..

तेवढ्यात तो पदार्थ उचलण्यासाठी भाऊही त्या बाऊलमध्ये हात घालतो पण त्यात काहीच नसते.. भावाचे सगळे लक्ष मोबाईलमध्ये असल्यामुळे त्याला ते समजतही नाही.. परंतु बहिण हे सगळ पाहते.. आणि भावाला हे खायचे आहे हे समजल्यावर ती तिच्या हातातला पदार्थ पुन्हा त्या बाऊलमध्ये टाकून देते..

त्यानंतर भाऊ तो पदार्थ उचलतो आणि सॉसमध्ये बुडवून बहिणीला खायला देतो.. हे सगळ करत असताना भावाचे लक्ष मात्र मोबाईलमधेच असते.. हे पाहून बहिण आपल्या भावावर खूप खुश होते.. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *