महत्वाच्या घडामोडी

भंगारातल्या स्कूटरचा देसी जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल…

प्रतिनिधी / व्हायरल

भारतातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटरअकाऊंटवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे.. ती नाविन्यपूर्ण आणि मजेशीर देखील आहे.. एका जुन्या स्कूटरचा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे..

एका बांधकाम साईटवर या स्कूटरचा टाकाऊ पासून टिकाऊ या युक्तीप्रमाणे वापर केला जात आहे.. या व्हायरल व्हिडीओमध्ये जुनाट स्कूटरचा वापर करून सिमेंटच्या गोणी चौथ्या मजल्यावर कशा प्रकारे पोहोचवल्या जात आहेत हे तुम्ही पाहू शकता..

या स्कूटरच्या मागच्या बाजूला एक रस्सी बांधलेली आहे.. स्कूटरला एकदा एक्सलेटर दिल्यानंतर स्कूटरच्या मागचे चाक फिरते आणि रस्सी गुंडाळत जाऊन गोणी सिमेंटची गोणी वरपर्यंत पोहोचवते.. हा व्हिडीओ पाहून चक्क उद्योगपती आनंद महिंद्रादेखील थक्क झाले आहेत..

हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केल्यानंतर अनेकांनी पाहिला आहे.. आणि या व्हिडीओला अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *