महत्वाच्या घडामोडी

आश्चर्यकारक ! बेल्जियमची तरुणी झाली भारताची सून…

प्रतिनिधी / कर्नाटक

प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमचं आमचं सेम असत.. या वाक्याला अपवाद ठरणारी एक लव्हस्टोरी समोर आली आहे.. या लव्हस्टोरीतील एका बेल्जियमच्या तरुणींनी भारतातील एका तरुणासोबत लग्नगाठ भांडली आहे..

केमिली ( वय – २७ ) तर अनंत राजू ( वय – ३० ) असे या नव दाम्पत्यांचे नाव आहे.. या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.. अनंत राजू हा पेशाने रिक्षा ड्रायव्हर आणि टुरिस्ट गाईडच काम करतो..

केमिली ही कोविडच्या आधी आपल्या कुटुंबासोबत भारतात हम्पी या ठिकाणाला भेट देण्यासाठी आली होती.. त्यावेळी राजू आणि तिची भेट झाली.. राजूने केमिली हिला शहरभर फिरवून इतिहासाशी निगडीत सर्व माहिती दिली होती.. तसेच एका हॉटेलमध्ये तिच्या राहण्याची सोयही केली होती..

अनंत राजू याने केमिलीचा एकंदरीतच चांगला पाहुणचार केला होता.. त्यानंतर केमिली बेल्जियमला परतली होती.. मात्र सोशल मिडीयाच्या माध्यमातून दोघे एकमेकांच्या संपर्कात होते.. हळूहळू त्यांची मैत्री वाढत गेली..

तीन वर्षे राजू आणि केमिली एकमेकांच्या संपर्कात होते.. त्यानंतर या दोघांनी आपआपल्या कुटुंबीयांकडे लग्नाची इच्छा व्यक्त केली.. दोघांच्या कुटुंबियांकडून होकार मिळाला होता.. त्यानंतर केमिलीच कुटुंब लग्नासाठी भारतात आले होते..

कर्नाटकाच्या विरुपाक्ष मंदिरात हिंदू रितीरिवाजानुसार अनंत राजू आणि केमिली यांचा विवाह पार पडला.. या लग्न सोहळ्यात केमिलीकडून बेल्जियमची मंडळी आणि अनंत राजूकडून त्याचे नातेवाईक उपस्थित होते.. या लग्नाची एकच चर्चा सध्या सुरु आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *