महत्वाच्या घडामोडी

बाळंतिणीने बाळासह रुग्णवाहिकेतून येऊन सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी दाखल केला अर्ज…

प्रतिनिधी / बीड

सध्या राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची लगबग सुरु आहे.. गावागावातील सरपंच पदासाठी इच्छुक कारभारी आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.. यामध्ये अनेक लक्ष वेधून घेणाऱ्या घटना समोर येत आहेत..

अशीच एक लक्ष वेधून घेणारी घटना बीड जिल्ह्यातील परळीमधून समोर येत आहे.. येथे एका काही दिवसांपूर्वीच प्रसूती झालेल्या महिला उमेदवाराने आपल्या बाळासह रुग्णवाहिकेतून येत सरपंच पदासाठी अर्ज भरला आहे..

सौ. पल्लवी अरुण माने असे वानटाकळी गावच्या इच्छुक महिला उमेदवाराचे नाव आहे.. सौ. पल्लवी माने यांची काही दिवसांपूर्वीच प्रसूती झाली आहे.. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्या रुग्णवाहिकेतून आपली उमेदवारी दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात दाखल झाल्या..

सौ. पल्लवी माने ह्या अर्ज दखल करण्यासाठी आपल्या कुटुंब आणि कार्यकर्त्यांसह आल्या होत्या.. आणि विशेष म्हणजे त्यांचे नवजात बाळही त्यांच्या सोबत होते.. ही घटना परळीत ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत लक्षवेधी ठरली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *