स्पेशल स्टोरीज

बहिण बांधते आपल्या बहिणीला राखी

आज रक्षाबंधन.. बहिण भावाच्या अतूट नात्याचा सन.. आजच्या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते.. आणि भाऊ आपल्या बहिनीच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो..

मात्र ज्या बहिणींना  भाऊच नाही त्या बहिणींच रक्षाबंधन नेमकं कस असत ?

आंबे तालुका पंढरपूर येथील या आहेत प्राजक्ता शिंदे आणि प्रतीक्षा शिंदे दोघी सख्ख्या बहिणी.. सख्खा भाऊ नसल्यामुळे त्या एकमेकींना राखी बांधून औक्षण करतात..

लग्नाच्या तब्बल आठ वर्षानंतर मोठी मुलगी म्हणजे प्राजक्ताचा जन्म झाला.. आणि त्या नंतर आठ वर्षानी प्रतीक्षा जन्माला आली.. मुलगा असता तर प्रतीक्षा बाबत त्याने सगळ्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या असत्या ही आई वडिलांची खंत प्राजक्ताला जबाबदाऱ्या पेलण्यासाठी तयार करत गेली

( प्रतिक्रिया )

राक्षबंधन हा बहिण भावाचा सन असला तरी प्राजक्ता आणि प्रतीक्षा परंपरेला फाटा देत वेगळा  पायंडा पाडला आहे.. फक्त मुलगाच नव्हे तर मुलगीही आपल्या सोबत इतरांच्या जबाबदाऱ्या खंबीरपणे पेलू शकते याचं हे   उत्तम उदाहरण आहे..

(प्रतिक्रिया )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *