महत्वाच्या घडामोडी

अमित शहांच्या गाड्यांच्या ताफ्यासाठी थांबवली अंबुलन्स…

प्रतिनिधी / मुंबई

अमित शहा हे ०५ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर आले होते.. त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली.. त्यानंतर भाजप नेत्यांसोबत त्यांची बैठक झाली, यावेळी बोलताना अमित शहा यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला.. तसंच खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं..

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात अनेक घडामोडी घडल्या.. अनेक राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीही त्यांनी घेतल्या.. मात्र एका व्हायरल व्हिडीओचीही चर्चा आता सगळीकडे होत आहे.. यात, अमित शहांच्या गाड्यांचा ताफा जाण्यासाठी एका रुग्णवाहिकेला रोखण्यात आल्याचं दिसत आहे.. यावरून आता टीकाही केली जात आहे..

तृणमूल कॉंग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.. ते म्हणतात की, मुंबईत असं काही घडेल याची कल्पना तुम्हीही केली नसेल.. अमित शहा यांच्या गाड्यांच्या ताफ्याला जाण्यासाठी चक्क रुग्णवाहिका रोखण्यात आली.. अमित शहा यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे.. ते व्हीआयपी आहेत, व्हीव्हीआयपी नाहीत.. तरीही पहिल्यांदा त्यांच्यासाठी मुंबईतील रस्ते बंद करण्यात आले आहेत.. भाजप सत्तेत आल्यापासून असे प्रकार होत आहेत असंही साकेत गोखले यांनी म्हटलं आहे.. हा व्हिडीओ पाहून लोकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *