महत्वाच्या घडामोडी

संतापजनक ! १००० रुपयांसाठी रुग्णवाहिकेच्या चालकाने गर्भवती महिलेला रस्त्यातच सोडले…”

प्रतिनिधी / उत्तरप्रदेश

उत्तरप्रदेशच्या हमीरपुर येथे पंधरी या गावात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे.. एका रुग्णवाहिकेच्या चालकाने गर्भवती महिलेसोबत धक्कादायक कृत्य केले आहे.. या चालकाने फक्त १००० रुपयांसाठी गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेतून रस्त्यातच सोडून दिल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.. महिला वेदनेनं कळवळत होती मात्र एकही वाहन तिच्या मदतीसाठी थांबल नाही.. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायलर होत आहे..

पंधरी गावातील एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्यावर रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलवण्यात आली.. पण जेव्हा रुग्णवाहिकेच्या चालकाला गर्भवती महिलेच्या नातेवाईकांकडे पैसे नसल्याचे समजताच त्याने रुग्णवाहिकेतून गर्भवती आणि तिच्या नातेवाईकांना खाली उतरवले.. रुग्णवाहिका चालकाने गर्भवती महिलेच्या नातेवाईकांकडे १००० रुपये मागितले होते.. तरच तिला रुग्णालयात पोहोचवू असे सांगण्यात आले..

पण, गर्भवती महिलेच्या कुटुंबाकडे तेव्हडे पैसे नसल्याने ते चालकाला तितके पैसे देऊ शकले नाहीत.. या कारणामुळे त्या चालकाने गर्भवती महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना रुग्णवाहिकेतून खाली उतरवले, आणि तो तेथून चक्क निघून गेला.. हा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे.. रुग्णवाहिकेच्या चालकावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *