स्पेशल स्टोरीज

पतीच्या मृत्युनंतर दोनच महिन्यात ती झाली सरपंच..पतीच्या स्वप्नासाठी सरपंच झालेल्या ‘ती ‘ ची गोष्ट…

प्रतिनिधी / पंढरपूर

तिच्या अंगा-खांद्यावर गुलाल आहे.. फटाक्यांच्या आवाजाने आसमंत दुमदुमत आहे.. गावकऱ्यांचा जल्लोष आहे.. मात्र, या सगळ्यातही तिच्या चेहऱ्यावर समाधान नाही.. तिची भिरभिरती नजर शोधते आहे तिच्या माणसाला, तिचा हा सत्कार, सन्मान तिला सगळं काही फिकं वाटतं.. या सगळ्या कालव्यात तिच्या पोटातली कालवाकालव तिला थांबवता येत नाही..

या आहेत धनश्रीताई तानाजी साळुंखे.. त्यांची नुकतीच वाखरी ता. पंढरपूर येथे सरपंच पदी निवड झाली आहे.. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या पतीच निधन झालं.. मात्र, आपल्या नवऱ्याच सरपंच होण्याचं, आणि समाजसेवेचं स्वप्न त्यांनी अपूर्ण राहू दिलं नाही.. चार दिवसांपूर्वी वाखरी ग्रामपंचायतीच्या बैठकीत सर्व सदस्यांनी त्यांना सरपंच करण्याचा विधायक निर्णय घेतला आहे..

धनश्रीताई उच्चशिक्षित आहेत.. आता इथून पुढ आपण लोकांची सेवा करू, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लावू, असं त्या खंबीरपणे सांगतात.. वाखरी हे पंढरपूर शेजारी असणारं मोठ गाव आहे.. मात्र, गावकऱ्यांनीही गटातटाचं राजकारण बाजूला ठेऊन धनश्रीताईवर विश्वास टाकल्याने त्यांचही सर्वत्र कौतुक होत आहे..

धनश्री यांच्यासोबत आता त्यांचे पती नाहीत.. त्या एकाकी आहेत.. मात्र, सरपंचपदाची जबाबदारी पार पाडण्यास त्या नक्कीच सक्षम आहेत.. जिजाऊ आणि सावित्रीची ही लेक गावाने दिलेली जबाबदारी खंबीरपणे पेलेल यात शंका नाही..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *